“जाऊ
दे न व...”
ए… ए….
ओ…
ए….
भूर भूर भूर
भूर भूर भूर
ओ… ए….
मध किती गोडं गोडं गोडं
झाडावर जु जु झूल
काडीवर मुंगळ्याची
सर्कस गोल गोल गोल
तोल जाऊन चाक
होई गोल गोल गोल
ट्रॅक्टर वर चक्कर
मारायची दूर दूर दूर
कागदाचं विमान
उडतंय भूर भूर भूर
आई मला खेळायला जायचंय
जाऊ दे न व…
नदीमध्ये पोहायला जायचंय
जाऊ दे न व…
माझा सगळा अभ्यास झालाय
जाऊ दे न व…
मी तुझं सगळं काम ऐकतो
जाऊ दे न व…
भूर भूर भूर
भूर भूर भूर
भूर भूर भूर
भूर भूर भूर
रोज सकाळी उठायचं
कोंबडीचं घर उघडायचं
पिल्लुच्या मागे नाचायचं
थुई थुई थुई थुई थुई…
रेडकूचा लोब करायचं
चकाचक आंघोळ करायचं
पटापट शाळेला जायचं
टमटम मध्ये बुई… बुई…
वर्गात कॉमिक्स ची
मज्जाच लई लई लई…
कच्चा जांबा बोरांची
गोडीच लई लई लई…
साबणाचे रंगीत रंगीत फुग्गे
उडवू लई लई लई…
दगड कि माती खेळायला
पोट्टे जमवू लई लई लई…
सगळ्यात जास्त लाड
माझी आज्जी करते
अंगणात गोष्ट ऐकवत
ऐकवत झोपवते
पण रात्री थंडीत झोप
मोडती न व..
आई मला तुझ्या कुशीतच आवडते
जवळ ये न व..
आई तुझा हात झोपताना
असाच राहू दे न व..
आजवानी उद्या बी खेळायला
जाऊ दे न व..
गायक : जयस कुमार
संगीत : प्रफुल्लचंद्र
Comments
Post a Comment