"Tula Japnar Aahe"
"तुला जपणार आहे"
कधी हसणार आहे
कधी रडणार आहे
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे
तुझे सारे उन्हाळे
हिवाळे पावसाळे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे
तुला जपणार आहे
कधी वाटेत काचा,
कधी खळगे नी खाचा
तुझ्या आधी तिथे पाय,
हा पडेल माझा
तू स्वप्न पहात जा ना
तू बस खुशीत रहा ना
माझ्याही वाट्याचे
घे तुला सारे
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे
कधी सगळ्यात आहे
कधी आपल्यात आहे
हि माझी काळजी सारी
तुला पुरणार आहे
कधी असणार आहे
कधी नसणार आहे
तरीही आरश्यात मी
तुझ्या दिसणार आहे
मी सोबत हात कायमचा
तुझा धरणार आहे
मी सारी जिंदगी माझी,
तुला जपणार आहे
चित्रपट - खरी बिस्किट
संगीत - अमितराज
गायक - आदर्श शिंदे आणि रोनकिनी गुप्ता
संगीत - अमितराज
गायक - आदर्श शिंदे आणि रोनकिनी गुप्ता
Comments
Post a Comment